बलरामपूर : बजाज साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ईटई मैदा येथे गेंदा सिंह ऊस उत्पादन तथा संशोधन संस्था सेवरही कुशीनगरचे किड, रोग शास्त्रज्ञ डॉ. विनय मिश्रा, डॉ. वाय. पी. भारती यांनी ऊस पिकाची पाहणी केली. कैश मोहम्मद, तिलकराम, राघवेंद्र, आज्ञाराम, अमृता सिंह आदी शेतकऱ्यांना ऊस पिकाचा किडींपासून बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस संशोधकांनी महुआ इब्राहिम, तेंदुई, बैदोलिया, संझवल प्रेमनगर, गिदौर, गुमडी, महदेईया, चमरुपूर, शाहपूर ईटई, दुभरा गोवर्धनपूर, बिथरिया परसपूर आणि विश्रामपूर गावातील ऊस पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना ऊस पिकाचा किडीपासून बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. याबाबत डॉ. विनय मिश्रा यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा ऊस पिक चांगले दिसून आले आहे. काही ठिकाणी पोक्का बोईंग रोगाचा फैलाव आढळला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कॉपर ऑक्सिक्लोराइड शंभर लिटर पाण्यात २०० ग्रॅम मिसळून फवारावे.
विभागात पाहणी दौरा केल्यानंतर संशोधकांनी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले. यावेळी ऊस महाव्यवस्थापक संजीव कुमार शर्मा, साखर कारखान्याचे युनिट प्रमुख राकेश यादव, सहाय्यक महाव्यवस्थापक आर. एस. मिश्रा, विजय कुमार पांडे, बृदेश प्रताप सिंह, रामायन पांडे यांसह प्रमुख उपस्थित होते.