शामली : खतौली साखर कारखान्याच्यावतीने जसाला गावातील शेतकरी देवेंद्र सिंह यांच्या प्रायोगिक प्लॉटवर आयोजित शेतकरी मेळाव्यात ऊस पिकाला टॉर बोरर किडीपासून बचावासाठी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी शेतकऱ्यांना ऊस विकास योजनेबाबत माहिती दिली. याशिवाय ऊसाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे या तंत्राबाबतही मार्गदर्शन केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, खतौली साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनी टॉप बोरर किडीची ओळख आणि त्याला आळा घालण्यासाठी कोराजन व फर्टेराचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी लाइट ट्रॅप वापरावा असा सल्ला त्यांनी दिला. कारखान्याच्या गाळप क्षमतेबाबत त्यांनी माहिती दिली. ऊस विभागाचे महाव्यवस्थापक कुलदीप राठी यांनी शेतकऱ्यांना पायरिला किडीच्या नियंत्रणाची माहिती दिली. शेतकऱ्यांना जादा उत्पादन मिळविण्यासाठीच्या टिप्स दिल्या.
सहाय्यक महाव्यवस्थापक विनेश कुमार यांनी पोक्का बोईंग रोगाची ओळख व उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. पावसाळ्याच्या काळात या रोगाचा फैलाव अधिक होतो असे ते म्हणाले. देवेंद्र कालखंडे यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याच्यावतीने देवराज सिंह, राज किशोर, रवि अवस्थी, कंवरपाल, अमित, शेतकरी डॉ. अमित चौहान, ईसम सिंह, बाबू, सुरेश पाल आदी उपस्थित होते.