युपी: छाता येथे उभारणार नवा साखर कारखाना, कॅबिनेटची मंजुरी

मथुरा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्री परिषदेने बुधवारी मथुराला मोठी भेट देताना गेली १४ वर्षे बंद पडलेला छाता साखर कारखान्याच्या नव्याने उभारणीला मंजुरी दिली. नवा साखर कारखाना ३००० टीसीडी क्षमतेचा असेल. यासोबतच ६० किलो लिटर प्रती दिन (केएलपीडी) क्षमतेच्या डिस्टलरी तथा लॉजिस्टिक हब-वेअरहाउसिंग कॉम्पलेक्सची स्थापना होईल. या योजनेसाठी ४७८४६.८८५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कारखान्याचा लाभ जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांना होईल. आणि शेकडो स्थानिक युवकांना रोजगार मिळेल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अलिकडेच मथुरा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साखर मंत्री तथा ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी छाता साखर कारखान्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. हा कारखाना २००९ मध्ये बंद पडला होता. १९७८ मध्ये १२५० टीसीडी क्षमतेचा कारखाना स्थापन करण्यात आला. त्याचे १९९४ मध्ये विस्तरीकरण करून क्षमता २५०० टीसीडी करण्यात आली. २००९ मध्ये पुरेसा ऊस उपलब्ध नसणे, सततचा तोटा यामुळे कारखाना बंद करण्यात आला. त्याची मशीनरी इतर युनिटला पाठवण्यात आली.

छाता साखर कारखाना महामार्ग १९ वरील रेल्वे स्थानकापासून जवळपास ५०० मिटरवर आहे. कारखान्याकडे ४३ हेक्टर जमीन आहे. आता नव्याने ३००० टीसीडी क्षमतेच्या कारखान्.यासह ६० केएलपीडीची डिस्टलरी तथा लॉजिस्टिक हब-वेअरहाउसिंग काम्प्लेक्स स्थापन होईल, असे ऊस मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here