अमरोहा : अमरोहा विभागात वेळेआधीच गव्हाची कापणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहात असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लवकर पक्व होणाऱ्या गव्हाचे पिक एप्रिलच्या मध्यापर्यंत पक्व होऊन कापणीस येते. मात्र, वालुकामय प्रदेश असलेल्या ठिकाणी पिके लवकर पक्व होतात. त्यामुळे गव्हाचे दाणे पूर्ण भरलेले नसतात. अशाच काही शेतकरी गहू आणि भुश्शासाठी लवकर पिकाची कापणी करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांच्या घरातील गहू समाप्त झाला आहे. जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे विकास विभागात गव्हाची कापणी सुरू आहे. गुरैठा गावातील हरकेश हे शेतकरी म्हणाले की, अलिकडेच झालेल्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे. जादा उत्पादन होणाऱ्या जमिनीतही पिकाला फटका बसला. गहू वाळल्याने यंदा त्याचे दाणे फारसे भरीव नसतील. त्यामुळे उत्पादन कमी होईल अशी शक्यता आहे.