पिलिभीत : श्रावण महिन्यापूर्वी पाऊस जोरदार बरसू लागला आहे. त्यामुळे शेती कामाला वेग आला आहे. या पावसाचा फायदा ऊस पिकाला मिळत आहे. तर भात पिकाच्या रोप लावणीलाही गती मिळाल्याचे दिसून येत आहे. पाऊस चांगला पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसत आहे. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने लोकांना थोडा दिलासा मिळाला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून पुरनपूर विभागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेती कामांना गती आली आहे. जून महिन्यात पाण्याअभावी वाळू लागलेल्या ऊस पिकाला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. जे शेतकरी भात पिकाच्या लावणीसाठी थांबले होते, त्यांनीही लावणीस सुरुवात केली आहे. सध्याचा पाऊस ऊस पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.