फारुखाबाद : गंगापारमध्ये २५ दिवसांपसून पुराच्या विळख्यात असलेल्या भागातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जवळपास २४ गावांतील शेतकऱ्यांचे ऊस पिक उद्धवस्त झाल्याच्या स्थितीत आहे. जनावरांसमोर चाऱ्याचे संकट आहे. लोकांना चाऱ्यासाठी वीस ते तीस किलोमीटर लांब जावे लागत आहे. सखल भागातील ६० गावांमध्ये पुराचे पाणी आहे. तर ४० हून अधिक गावांतील लोकांना बोटींचा आधार घ्यावा लागला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यंदाचा पूर दीर्घकाळ आहे. गंगापार परिसरात डझनभर रस्ते पाण्याखाली आहेत. डांडीपूरला जाणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे लोकांना लांबच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. भरखा परिसरात रस्त्यावर पाणी आहे. सलेमपुर रस्त्यावर अडचणी आहेत. राजेपूर चौकाजवळ पाणी आहे.
शमसाबाद विभागातील रुपपूर मंगलीपुर, कटरी तौफीकपुर, अचानकपुर, बिरियाडाडे, ढाईघाट चितार, तराई, कमथरी ही गावे पाण्याच्या विळख्यात आहेत. समेचीपूर चितारमधील पश्चिम विभागात पाणी पसरू लागले आहेत. पैलानी दक्षिणमध्येही पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. अमृतपूर विभागात पुराच्या पाण्यात २४ गावांतील ऊस शेती आहे. हा ऊस पूर्णपणे खराब होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.