बस्ती/मुंडेरवा : चीनी मंडी
बंद पडलेल्या मुंडेरवा साखर कारखान्याच्या जागी दुसऱ्या साखर कारखान्याच्या उभारणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जापैकी दुसरा हप्ता केला आहे. या हप्त्यातील ८० कोटी रुपये जमा झाले आहेत. उभारण्यात येणारा नवीन कारखाना ३ हजार ५०० टीसीडी आणि १८ को-जनरेशन क्षमतेचा असणार आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र उत्तर प्रदेशच्या विशेष सचिवांनी राज्य साखर आयुक्तांना पाठविले आहे.
उत्तर प्रदेश राज्य साखर मंडळाचा जनपद बस्ती येथील मुंडरेवा साखर कारखाना बंद पडला आहे. तेथे नव्याने साखर कारखाना उभारण्यासाठी पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डाने ३१४.०९ कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यातील कर्ज रुपाने देण्यात येणारे पहिल्या हप्त्यातील ९० कोटी रुपये २६ मार्च २०१८ रुपये देण्यात आले होते. यंदाच्या आर्थिक वर्षात कारखान्यासाठी २४० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ८० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वर्ग करण्यात आला आहे.
विशेष सचिवांच्या पत्रात म्हटले आहे की, कारखान्यासाठी देण्यात आलेले कर्ज दहा वर्षे मुदतीसाठी असून, व्याजदर १४ टक्के असणार आहे. कर्जाची नियमित परतफेड होत असल्यास व्याजदरात अडीच टक्क्यांची सूट मिळणार आहे. देण्यात आलेली रक्कम त्या त्या कामासाठीच खर्च करणे बंधनकारक असणार आहे.