पीलीभीत (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या ऊस विभागाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अशी ऊस खरेदी केंद्रे खुली केली आहेत, जी 24 तास खुली राहतील. शेतकर्यांना 24 तास ऊस विक्रीची सुविधा देणे तसेच रस्त्यावर ऊस वाहतुकीमुळे होणार्या ट्रॅफीक जामच्या समस्या मिटवण्यच्या उद्देशातून ही केंद्रे खुले करण्यात आली आहेत. या प्रोजेक्टला राज्यातील 45 ऊस उत्पादक जिल्ह्यामंध्ये लागू करताना मॉडल ऊस पुरवठा केंद्र स्थापित करण्याची योजना आहे. आतापर्यंत या केंद्रांवर केवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंतच शेतकरी आपल्या ऊसाची विक्री करु शकत होते.
उत्तर प्रदेश चे अतिरिक्त ऊस आयुक्त वाई एस मलिक यांनी सांगितले की, या प्रोजेक्टच्या अंतर्गत प्रदेशातील सर्व 119 साखर कारखान्यातील प्रत्येक ऊस पुरवठा सर्कलमध्ये कमीत कमी एक मॉडल ऊस केंद्र स्थापन केले जाईल. हा प्रोजेक्ट पुढच्या गाळप हंगामापर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. आतापर्यंत तीन जिल्ह्यात पाच मॉडल केंद्र सुरु केले आहेत, ज्यामध्ये एक एक हरदोई आणि बागपत मध्ये तर तीन लखीमपूर खिरी मध्ये आहे. या प्रोजेक्ट अतर्गत नीट काम करत नसलेल्या सध्याच्या दोन तीन केंद्र मिळून एक मॉडल ऊस खरेदी केंद्र स्थापन करण्याचीही योजना आहे.
मलिक यांनी सांगितले की,ऊसाच्या विक्रीला उशिर झाल्यामुळे पडून राहिलेला ऊस वाळतो, यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. तसेच काटामारीच्या तक्रारी दूर करण्याच्या हेतूने ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. कारखान्यांमध्ये ऊसाच्या पुरवठ्यासाठी या मॉडल ऊस खरेदी केंद्रांवर पर्याप्त कर्मचार्यांच्या नियुक्ती करण्याबरोबरच, शेतकर्यांसाठी विविध सोयीही करण्यात येणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.