युपी : ऊस बिलातून प्रती क्विंटल १ रुपया कपातीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुरनपूर : सहकारी ऊस विकास समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडून प्रस्तावित प्रती क्विंटल 1 रुपये कपातीला तीव्र विरोध केला. ऊसाचा दर ५०० रुपये प्रती क्विंटल झाल्यावरच कपात करा, असे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. जोरदार विरोधामुळे या बैठकीत कोणत्याही प्रस्तावावर एकमत होऊ शकले नाही.

बैठकीत सहकार विभागाने मुख्यमंत्री शेतकरी संपूर्ण समाधान योजनेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रती क्विंटल १ रुपये कपात करून निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. मागील सभेप्रमाणे या वेळीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्लिप, पेमेंट व इतर समस्यांबाबत गदारोळ केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक ज्ञानेंद्र सिंह ग्यानी होते. अनिल शुक्ला यांनी संचलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनमानी सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी माजी अध्यक्ष श्रीकांत सिंग, लक्ष्मीकांत भारद्वाज, हरदेव सिंग, स्वदेश सिंग, अजय सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here