मुरादाबाद : रानी नांगल येथील त्रिवेणी साखर कारखान्याच्या पथकाने रविवारी तोडणी पावती जारी न झाल्याने ऊस इतरत्र घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढून ही वाहने रोखले. कारखान्याच्यावतीने लवकरच तोडणी पावती जारी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्रिवेणी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. वेंकट रत्नम, कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक टी. एस. यादव, तांत्रिक महाव्यवस्थापक सरदार सुखविंदर सिंह, सोदासपूर विभाग प्रभारी अनिल डोग्रा, ऊस अधिकारी अमित चौधरी, सुपरवायझर गजेंद्र सिंह, हिमांशू चौहान आदींनी पिलकपूर गुमानीच्या मार्गावर अवैध पद्धतीने सुरू असलेली ऊस वाहतूक रोखली. ऊसाने भरलेले शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडवून त्यांची समजूत काढण्यात आली. महाव्यवस्थापक टी. एस. यादव म्हणाले की, नियमानुसार दररोजच्या गाळप क्षमतेचा आढावा घेवून तोडणी पावत्या जारी केल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांची नोंद कमी उसाची आहे, त्यांच्या पावत्या ११ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येतील.
कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. व्यंकटरत्नम यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्यानंतरच कारखाना बंद होईल. २६ मार्चपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात आली आहेत. शेतकरी नेते प्रीतम सिंह यांना कारखान्याने वाहने रोखण्याचे समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी शेतकरी संजीव कुमार, जसवीर सिंह, दिनेश कुमार, सुभाष सिंह, अमित कुमार, विपिन कुमार आदी उपस्थित होते.