मेरठ: मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ या मधील १७ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीतील ३६.२८ कोटी रुपयांची ऊस बिले संबंधित समित्यांना पाठवली आहेत. गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसापोटी साखर कारखान्याने आतापर्यंत ६७०.०७ कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे वरिष्ठ महा व्यवस्थापक (ऊस आणि प्रशासन) प्रमोद बालियान यांनी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या नोंदी तपासण्याचे आवाहन केले. २० जुलैपासून साखर कारखान्याच्यावतीने या कामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या गावात उपस्थित राहून उसाची नोंद तपासावी. त्रुटी आढळल्यास त्याची तातडीने माहिती द्यावी असे सांगितले.
कारखाना कार्यक्षेत्रात उसावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव दिसून येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ५०० ग्रॅम प्रती एकर २५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा एकदा तशीच प्रक्रिया करावी असे कारखान्याच्या महा व्यवस्थापकांनी सांगितले. कीड, रोगाच्या नियंत्रणावर भर दिला जात आहे. या फवारणीने पोक्का बोईंगचा फैलाव रोखणे शक्य असल्याचे ते म्हणाले.