लखनौ : उत्तर प्रदेशामध्ये (युपी) १२० साखर कारखाने आहेत आणि त्यांचे एकूण वार्षिक इथेनॉल उत्पादन १७५ कोटी लिटर आहे. सोमवारी इंधन कंपन्यांनी २०२२-२३ साठी ४०० कोटी लिटर इथेनॉलची प्रस्तावित वाटपाची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये युपीचे यागदान एकूण वाटपाच्या १८ टक्के आहे. हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. युपीतील पहिल्या यादीनुसार ओएमसींना ७१ कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध केले जाईल आणि आगामी काळात याचे प्रमाण वाढत जाणार आहे.
जैव इंधनाबाबतच्या राष्ट्रीय धोरणानुसार, २०२५-२६ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे. आणि इथेनॉलची आवश्यकता १०१६ कोटी लिटरची असेल. सद्यस्थितीत हे प्रमाण १० टक्के इतके आहे. साखर उद्योगाने आगामी तीन वर्षात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्य मागितले आहे.
दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, UPSMA चे महासचिव दीपक गुप्तारा यांनी सांगितले की, २० टक्के मिश्रण हे निश्चितच आक्रमक रुप आहे. यासाठी आम्ही इथेनॉलच्या अतिरिक्त प्रमाणात उत्पादन वाढविण्यासाठी आपल्या कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज आहे. जर सरकारने आर्थिक रुपात आम्हाला मदत केली, तर उद्दिष्टपूर्तीचे ते एक योग्य लक्ष ठरेल.