सहारनपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ऊस विकास समित्यांमध्ये एक कोटी रुपयांपर्यंतचा ऊस गुंतवणूक निधी उभारण्यात येणार आहे. त्याचा लाभ लघू तसेच मध्यम गटातील शेतकऱ्यांना होईल. ऊस उपायुक्त ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी खते आणि किटकनाशकांसह यंत्रांपर्यंत सर्व खरेदी ऊस समित्यांच्या माध्यमातून केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना कमी व्याज द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ऊस विकास समित्यांमध्ये ऊस गुंतवणूक निधी स्थापन केला जाईल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या निधीच्या माध्यमातून नाबार्ड कर्ज योजनेप्रमाणे कृषी गुंतवणुकीवर वार्षिक १०.७० टक्के व्याजावर शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३.७० टक्के सूट दिली जाईल. यातून शेतकरी आपल्या ऊस पिकामध्ये पैसे खर्च करून चांगले उत्पादन घेवू शकतात. ऊस गुंतवणूक निधीचा सर्वाधिक फायदा लघू तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे.