श्रावस्ती : पावसाचे आगमन होण्यास फार कालावधी शिल्लक नाही. त्यामुळे शेतकरी शेतात भात रोपवाटिका लावून रोप रोवणीसाठी मान्सूनची प्रतीक्षा करीत आहेत. तर प्रशासनाकडून कालवे दुरुस्ती व साफसफाईची कामे सुरू आहेत. यांदरम्यान जिल्ह्यात शेते तहानलेली आहेत. ऊस, मका उत्पादक शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी चिंतेत आहेत. तर कालवे कोरडे पडले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पाणी नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याची चिंता त्यांना भेडसावत आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी कृतिका शर्मा यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी नाले सफाईची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले. याची तांत्रिक पथकाकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यावेळी सीडीओ अनुभव सिंह, एएसपी प्रविण कुमार यादव, कार्यकारी अभियंता विनोद कुमार गुप्ता, कार्यकारी अभियंता अजय कुमार, सहायक अभियंता मनोज कुमार यांच्यासह संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते.