मेरठ : सहा जिल्ह्यांतील शेतकरी मेरठ येथे मंगळवारी एकत्र येणार आहेत. विविध मुद्यांवर एकाचवेळी पंचायतीचे आयोजन केले जाणार आहे. मेरठमधील कमिश्नर पार्कमध्ये ही पंचायत होईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या विज, ऊस थकबाकी आणि पिकांच्या समर्थन मूल्यावर चर्चा होईल. यावेळी पुढील धोरण ठरवले जाईल.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियन अराजकीयच्या मासिक पंचायतीचे आयोजन यावेळी मेरठमध्ये होणार आहे. याबाबत भाकियू अराजकीयचे पदाधिकारी विनोद जिटोली यांनी सांगितले की, शेतकरी खूप हवालदिल झाले आहेत. गावागावात वीज नाही. विजेत कपात केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना भरमसाठ विजेची बिले येत आहेत. सरकारने पिकांचे समर्थन मूल्य वाढवलेले नाही.
सरकारने जसे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या सर्व मुद्यांवर पंचायतीमध्ये चर्चा होईल. पंचायतीमध्ये मेरठ, हापुड, गाझियाबाद, नोएडा, शामली, बुलंदशहर येथून शेतकरी सहभागी होतील. पूर्ण विभागाची ही बैठक आहे.