तिलहर : ऊस उपायुक्त राजीव राय यांनी लाखोहा गावात सुरू असलेले ऊस सर्वेक्षण व ऊस नोंदणी सादरीकरणाची पाहणी केली. राय यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्यासमेवत जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र मिश्रा उपस्थित होते.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उपायुक्तांनी अचानक लाखोहा गावाचा दौरा केला. त्यांनी वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक उमाकांत द्विवेदी यांच्यासमवेत ऊस पिकाची पाहणी केली. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी व सर्व्हे योग्य आहे की नाही याची पडताळणी करावी असे राय यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपली सर्वेक्षण यादी तपासून पाहावी. यामध्ये जी काही दुरुस्ती करायची आहे, ती तत्काळ जागेवरच करावी. सर्व शेतकऱ्यांनी मुख्य संगणक कक्षात आधार क्रमांक नोंदवावेत.
उपायुक्त राजीव राय यांनी तपासणीदरम्यान ६०० सदस्यांपैकी ४३५ सदस्यांच्या ऊस नोंदणी अर्जाची पाहणी केली. निरीक्षक उमाकांत द्विवेदी यांनीही शेतकऱ्यांना नोंदणी अर्ज अचूक भरण्याचे आवाहन केले. ग्राम प्रमुख सुधीर कुमार गंगवार यांनीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती दिली.