युपी: थानाभवनचा हंगाम समाप्त, ऊन, शामली कारखान्याचे गाळप सुरुच

शामली : बजाज समुहाच्या थानाभवन साखर कारखान्याने एक कोटी २७ लाख २५ हजार क्विंटल उसाचे गाळप करुन हंगामाची समाप्ती केली. यावेळी हा कारखाना गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा दिवस आधीच बंद झाला आहे. तर ऊन आणि शामली या कारखान्यांचे गाळप सुरूच आहे. मात्र कार्यक्षेत्रात अद्याप ऊस उपलब्ध असल्याने ऊन साखर कारखाना २० एप्रिल तर शामली साखर कारखाना मे महिन्याच्या पहिला आठवड्यापर्यंत गाळप करेल असे सूत्रांनी सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी शनिवारपासून ऊस सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. गळीत हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व्हे सुरू होईल. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सर्व ऊस नोंदवला जावा यासाठी प्रयत्न करावा. जर ऊस नोंदवला नसेल तर पुढील हंगामात त्याचे गाळप केले जाणार नाही, याबाबत जागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व्हेवेळी ऊस पर्यवेक्षक, साखर कारखान्याचा कर्मचारी आणि शेतकऱ्याची उपस्थिती अनिवार्य आहे. सर्व्हे करून त्याची पावती शेतकऱ्याला देण्यात यावी. सध्याच्या उन्हाचा कालावधी पाहता हा सर्व्हे सकाळच्या सत्रात करावा अशी सूचना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन घोषणापत्र अपलोड करण्याबाबतही माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे असे जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here