पलियाकला : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शारदा वर्कर्स असोसिएशन आणि शारदा साखर कारखाना कामगार संघाच्या बॅनरखाली सुरू असलेले आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेतले.
शारदा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी २९ जून २०२२ रोजी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले होते. रविवारी दुपारी साखर कारखान्याचे युनिट हेड ओ. पी. चौहान यांनी कर्ममचाऱ्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याबाबत कारखाना प्रशासनाशी चर्चा केली. लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करू असे आश्वासन देण्यात आले, असे अमर उजालाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
यावेळी असोसिएशनचे नेते निर्भय नारायन सिंह आणि शारदा साखर कारखाना कामगार संघाचे नेते अफरोज अन्सारी यांच्याशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.