मुजफ्फरनगर : टिकौला साखर कारखान्याने गळीत हंगाम समाप्तीनंतर तीन दिवसातच शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले दिली आहेत. हा कारखाना आता राज्यात ऊस बिले देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचा एक रुपयाही थकीत ठेवलेला नाही. तर भैसाना साखर कारखाना ऊस बिले देण्यात सर्वात पिछाडीवर आहे. कारखान्याने केवळ १५ टक्के ऊस बिले दिली आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात आठ साखर कारखाने आहेत. यात खतौली, टिकौला, मन्सूरपूर, तितावी, खाईखेडी, रोहाना, मोरना, भैसाना यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी यंदा ३५ अब्ज ४० कोटी ६८ लाख एक हजार रुपयंच्या ऊसाची विक्री केली. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी ८३.८० टक्के ऊस बिले दिली आहेत. म्हणजेच २८ अब्ज ८६ कोटी २१ लाख २३ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले आहेत. खतौली आणि मन्सूरपूर हे कारखाने ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना १४ व्या दिवशी पैसे देत आहेत. टिकौला साखर कारखाना आघाडीवर आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच चौदा दिवसात पैसे देण्याची भूमिका ठेवली. हंगाम समाप्तीच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सर्व देणी दिली आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांना सहा अब्ज ४० कोटी ११ लाख २७ हजार रुपयांचा ऊस दिला आहे. कारखान्याकडे कोणाचेही पैसे थकीत नसल्याचे आणि हा कारखाना जिल्ह्यात, विभागात आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे कारखान्याचे संचालक निरंकार स्वरूप यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पैसे देणे हे आमचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.