माछरा : विभागातील नंगलामल आणि मवाना साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आज संपुष्टात येणार आहे. नंगलामल साखर कारखान्याचे विभाग अध्यक्ष एल. डी. शर्मा यांनी सांगितले की, साखर कारखान्याने गळीत हंगाम समाप्तीची अंतिम नोटीस दिली आहे. १३ मे रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून गाळप बंद करण्यात येईल. सर्व खरेदी केंद्रांवरील तोडणी पावत्या समाप्त झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ऊस शिल्लक होता, त्यांच्यासाठी सुविधा देण्यात आली होती.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नंगलामल कारखान्याने १ नोव्हेंबर २०२२ रोजी गळीत हंगाम सुरू केला. ११ मेअखेर कारखान्याने १९२ दिवसांत १०६.३० लाख क्विंटल उसाचे गाळप केले. त्याचे मूल्य ३६६.४१ कोटी रुपये आहे. तर २८ एप्रिलअखेर ३४१.७६ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. नव्या हंगामासाठी उसाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
दरम्यान, मवाना साखर कारखान्याने शुक्रवारी गळीत हंगाम समाप्तीची तिसरी नोटीस दिली. आज, १३ मेपासून कारखाना बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यातले. कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, २०२२-२३ या गळीत हंगामात ११ मेअखेर कारखान्याने २१०.०३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. कारखान्याच्या १६१ खरेदी केंद्रांपैकी १४४ केंद्रांचे कामकाज संपुष्टात आले आहे. कमी ऊस पुरवठ्यामुळे यापूर्वी दोनदा हंगाम समाप्तीची नोटीस जारी करण्यात आली होती.