युपी: अवकाळी पावसाने वाढली शेतकऱ्यांची चिंता, मोहरी, गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान

बागपत : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रविवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिला. सोमवारी सकाळी ऊन्ह दिसले नाही. जोरदार वारे सुटले होते. तर वातावरण बदलल्याचे दिसून आले. दुपारी एकच्या सुमारास मेरठ, मुजफ्फरनगर, बागपत सह उत्तर प्रदेशच्या पश्चिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. बागपत मधील सिंघावलीमध्ये गारपीटही झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आणखी दोन दिवस पावसाची स्थिती राहू शकते असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसानंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. हवामान शास्त्रज्ञ डॉ. युपी शाही यांच्या म्हणण्यानुसार, आणखी दोन दिवस पाऊस कोसळू शकतो. हवामान कार्यालयात कमाल तापमान २६.५ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान १५.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मेरठमध्ये हवेची गुणवत्ता १०५ नोंदविण्यात आली. गंगानगर, जयभीमनगर, पल्लवपूरम येथेही ९२, ११७ आणि १०७ एक्यूआय नोंदविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here