बिजनौर : ऊसाचा सर्व्हे करताना चुकीची माहिती अपलोड होणे अथवा माहिती न संकलन होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. असे घडू नये यासाठी ऊस विभागाने वीस जुलैपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी नोंदणीचे सादरीकरण केले जाणार आहे. कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सर्व्हेची परिपूर्ण माहिती देतील. जर एखादी त्रुटी असेल तर त्याचे त्वरीत निराकरण केले जाईल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख शेतकरी आहेत. आगामी हंगामात ऊस पिकापासून चांगले उत्पादन मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनीही तयारी सुरू केली आहे. ऊस हंगामासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्व्हेनंतर कृषी विभागातील अधिकारी व साखर कारखान्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून माहितीची पडताळणी करतील. शेतकऱ्यांची लागण व खोडवा ऊस याची माहिती दिली जाईल. जर त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील.
सर्व्हेचा सर्व अहवाल कृषी विभागाच्या वेबसाइटवर फीड करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तेथेही पूर्ण माहिती मिळू शकेल. त्याला अंतिम रुप देण्यापूर्वी वीस जुलैपासून गावोगावी नोंदणीच्या माहितीचे सादरीकरण केले जाईल. शेतकऱ्यांनी तेथेच त्रुटींची दुरुस्ती करावी असे आवाहन जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी केले आहे.