मेरठ : ऊस गळीत हंगाम २०२३-२४ साठी गाववार सर्वेक्षणाचे सादरीकरण सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना सर्व्हेमध्ये ऊसाचे लागवड क्षेत्र, खोडवा व लागण उसासह प्रजातीची माहिती मिळत आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. या सर्व्हेमध्ये त्रुटी आढळून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोणाचे ऊस लागवड क्षेत्र कमी दाखवले आहे तर अनेकांच्या खोडवा व लागण उसातही तफावत दर्शवली आहे. या त्रुटींचे निराकरण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदाच्या नव्या गळीत हंगामासाठी ऊस विभागाने १५ जूनपर्यंत सर्व्हे केला आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यावर २० जुलैपासून गाववार पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी ऊस विभागाकडून हे सर्वेक्षण केले जाते. त्याच्या आधारावरच साखर कारखान्यांना ऊसाचे वाटप केले जाते. या सर्व्हेतील माहितीची खातरजमा केली जाते. त्रुटी दूर केल्या जातात. सध्या हीच प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, गाववार ऊस नोंदीची पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपले आक्षेप नोंदवावेत. त्यानुसार त्याची सत्यता तपासून दुरुस्ती केली जाईल.