लखनौ : योगी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या खरेदीवरील खर्च सरकार करणार आहे. युपीत सुरू असलेल्या सरकारी गहू खरेदीत असा गव्हाची खरेदी किमान समर्थन मूल्यावर जास्तीत जास्त ३७.१५ रुपये प्रती क्विंटल कपातीने केली जाईल. जास्तीत जास्त कपातीचा ३७.१८ रुपये प्रती क्विंटल दरापेक्षा अधिक कपात झाल्यास त्या रक्कमेची प्रतीपूर्ती राज्य सरकार करणार आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याबाबत अन्न विभागाने आणलेल्या प्रस्तावाला शुक्रवारी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस आणि गारपीटीमुळे गव्हाच्या पिकाची उत्पादकता कमी झाली असून त्याची गुणवत्ता खराब झाली आहे. याबाबत केंद्र सरकारने सर्व प्रकारचा गहू खरेदी करावा असे निर्देश दिले होते. अशा कमी गुणवत्तेचा गहू खरेदी केल्यावर ३७.१८ रुपये प्रती क्विंटल कपात केली जाईल. ती राज्य सरकार देणार असून शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य २१२५ रुपये प्रती क्विंटल दराने पैसे दिले जातील.