महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ: राष्ट्रवादीचे अजित पवार बनले नवे उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती, अजित पवार बंडखोरी करून सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला होता. आता त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दुपारी राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री असतील.

मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नेत्यांची यादी
अजित पवार – उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ – मंत्री
धनंजय मुंडे – मंत्री
धर्मरावबाबा आत्राम – मंत्री
आदिती तटकरे – मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here