ऊस उत्पादन वाढीसाठी UPL आणि साखर कारखान्यात सामंजस्य करार

मुंबई : ऊस उत्पादनासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी युपीएल (UPL Ltd) – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (Shreenath Mhaskoba Sugar Mill) यांदरम्यान सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. याबाबत युपीएल लिमिटेडने म्हटले आहे की, त्यांनी महाराष्ट्रात स्थायी ऊस उत्पादनासाठी (sustainable sugarcane production) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यासोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. युपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा सामंजस्य करार शेतकऱ्यांची चिंता दूर करेल. आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्याबाबतही यातून मार्ग निघेल. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आणि Zeba technology च्या मदतीने, युपीएलने केवळ १०,००० एकर जमिनीवर उसाचे उत्पादन १५ टक्क्यांनी वाढीचे लक्ष्य ठेवलेले नाही तर यासाठीचा उत्पादन खर्च कमी करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल आणि त्यांना आर्थिक फायदा मिळेल. हे अभियान महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांतील ४००० हून अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देईल.

Zeba technology च्या मदतीने युपीएलला ६०० कोटी लिटर पाणी आणि ५०० टन युरीया वाचविण्याची अपेक्षा आहे. याबाबत युपीएलचे सीईओ जय श्रॉफ यांनी सांगितले की, युपीएल OpenAg सारखे स्थायी तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्म उभारणीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. यातून संपूर्ण उद्योगाचा विचार आणि काम करण्याची पद्धती बदलून जाईल. आणि कृषी उत्पादनांच्या साखळीमध्ये प्रगतीसाठी सुविधा उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here