बजाज हिंदूस्थान शुगरच्या शेअर्सवर २० टक्क्यांचे अप्पर सर्किट

बजाज हिंदूस्थान शुगर कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारी, २ डिसेंबर रोजी बीएसईवर २० टक्क्यांची उसळी घेवून अप्पर सर्किटला स्पर्श केला. शेअर्समधील या वाढीनंतर कंपनीने आपले सर्व थकबाकी फेडल्याचे वृत्त आहे. आता कंपनीवर कर्जाची कोणतीही थकबाकी नाही. बजाज हिंदूस्थान शुगर्सने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. आम्ही सर्व कर्जदात्यांचे टर्म लोन इन्स्टॉलमेंट (सप्टेंबर २०२२ पर्यंत), टर्म लोन व्याज (नोव्हेंबर २०२२पर्यंत) आणि ऑप्शनली कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (ओसीडी) कुपन आर्थिक वर्ष २०२२ पर्यंतसाठी देय असलेल्या बाबींची परतफेड केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, बजाज ग्रुपच्या या कंपनीने म्हटले आहे की, सद्यस्थितीत आता आमच्यावर कोणतीही जुनी थकबाकी नाही. आणि आजघडीला सर्व कर्जदारांसमवेत आम्ही नियमित आहोत. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर शेअर बाजाराच्या ट्रेडिंग सेशननंतर बजाज हिंदूस्थान शुगरचा शेअर २० टक्क्यांनी वाढून १३.५२ रुपयांवर बंद झाला. या शुगर कंपनीच्या शेअरची कामगिरी यावर्षी निराशाजनक राहिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला शेअरमध्ये ११ टक्क्यांची घसरण झाली तर गेल्या सहा महिन्यात ४.५९ टक्के शेअर घसरला. आता कर्जाबाबतची चिंता दूर झाल्याने शेअरने गुंतवणूकधारकांना आकर्षित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here