ऊसातील हुमणीचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज

कोल्हापूर : गेल्या सात- आठ वर्षांत हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीस ते चाळीस टक्के उत्पादन घटले. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत बंदोबस्त व्हावा, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वळवाच्या पावसानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होतो. मे-जून महिन्यातच प्राथमिक टप्प्यात हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य होते. यामुळे कृषी विभागाने त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. खरीप हंगामाच्या तयारीबरोबरच हुमणी नियंत्रणासाठी प्रबोधन, प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविली जात आहेत.

वळीव पावसाच्या हजेरीने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मे महिन्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाला. या पावसानंतर जमिनीतील भुंगे सूर्यास्तानंतर बाहेर पडतात. ते बाभूळ, कडुनिंब किंवा बोर झाडावर पाने खाण्यासाठी बसतात. या भुंग्यापासूनच पुढे जमिनीत हुमणीची अळी तयार होते. याचा प्रादुर्भाव हळूहळू दिसून येतो. त्यामुळे प्रकाश सापळे लावावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हातकणंगले तालुक्यात गेल्या पाच वर्षांत हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक टप्प्यात याचे नियंत्रण होणे गरजेचे असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here