अमेरिका : कमी कराच्या साखर आयात कोट्यात 125,000 मेट्रिक टन वाढ

न्यूयॉर्क : अमेरिकन सरकारने देशांतर्गत बाजारपेठेत साखर पुरवठा पातळी सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवत कमी दरातील साखर आयातीचा कोटा 125,000 मेट्रिक टनांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कमी-शुल्क कोटा अर्थात TRQ योजनेंतर्गत आयात करता येणाऱ्या उसाच्या कच्च्या साखरेचे एकूण प्रमाण आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.24 दशलक्ष टन इतके वाढले आहे. परकीय कृषी सेवा विभागाने एका नोटमध्ये म्हटले आहे कि, अमेरिकन मार्केटमध्ये कच्च्या उसाच्या साखरेचा अतिरिक्त पुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिका साखरेचा पुरवठा करणाऱ्या देशांसाठी कोटा जाहीर करेल.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here