नवी दिल्ली : अमेरिका आणि ब्राझील, हे जगातील दोन बडे जैव इंधन बाजारत भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमात सहभागी होत आहे. कमी उत्सर्जन करणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांच्या मागणीला प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय जैवइंधन आघाडीचे सदस्यही इंधन उत्पादन करण्यासाठी जैविक कचऱ्याचा वापर करण्यासाठी अभियान राबविणार आहेत. बेंगळुरुमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय इंडिया एनर्जी वीक फोरमदरम्यान, पुढील रुपरेषा तयार केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधीत करणार आहेत. आणि त्यांनी वैकल्पिक इंधनाच्या वापराचे समर्थन केले आहे. २०२१ मध्ये मिश्रीत पेट्रोल २०२५ पर्यंत २० टक्के करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. धोरणात्मक उद्देशाने वायू प्रदूषण मर्यादेमध्ये ठेवणे, भारताची तेल आयात घटविणे महत्त्वाचे आहे. भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अर्थसंकल्पात ऊर्जा सुरक्षेला आणखी मजबूत करण्यासाठी आणि २०७० पर्यंत शुद्ध शुन्य उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याच्या मोदी यांच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी ३५० बिलियन रुपये (४.३ बिलियन डॉलर) मंजूर केले आहेत.