वॉशिंग्टन: कोरोना महामारी चा सर्वात जास्त परिणाम झालेल्या अमेरिकेच्या फेडरल सरकारला या वर्षी जून महिन्याच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या बजेट नुकसानीचा सामना करावा लागला. सरकाला एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी अधिक खर्च करावा लागला तर दुसरीकडे लाखो नोकर्या गेल्याने त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. अमेरिकेच्या राजकोषीय विभागाने सोमवारी सांगितले की, गेल्या महिन्यात नुकसान वाढून 864 अरब डॉलर वर पोचले आहे. हा आकडा एमरिकेच्या इतिहासाच्या कित्येक वर्षाच्या नुकसानीपेक्षा अधिक आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये अमेरिकेला 738 अरब डॉलर चे मासिक नुकसान झाले.
अमेरिकी कॉग्रस ने कोरोनाशी निपटण्यासाठी पूर्वीच अरबो डॉलरचा निधी उपलब्ध केला आहे. अमेरिकेचे बजेट नुकसान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्याच्या दरम्यान एकूण 2,740 अरब डॉलर पर्यंत पोहोचले आहे. नऊ महिन्याच्या या अवधीसाठी हे नुकसान एक रेकॉर्ड आहे. याप्रमाणे पूर्ण वर्षाचे नुकसान 3,700 अरब डॉलरपर्यंत पोहचू शकते. अमेरिकेच्या काँग्रेस अर्थातच संसदे ने वर्षाच्या दरम्यान बजेट नुकसान या स्तरापर्यंत पोचण्याची शक्यता वर्तवली आहे.
अमेरिकेचे हे नुकसान त्याच्या वर्ष 2009 च्या गेल्या वर्षीचे रेकॉर्ड 1,400 अरब डॉलरच्या तुलनेत कितीतरी जास्त असेल. त्याचवेळी आलेल्या मंदीमुळे अमेरिकी सरकारने अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी मोठा खर्च केला होता. अमेरिकी सरकारने कोरोना मुळे लॉकडाउन लागू केला ज्यामुळे कित्येक लोक बेरोजगार झाले. लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरु करण्यात आले. बेरोजगारांना 600 डॉलर प्रति आठवड्याचा अतिरिक्त लाभ दिला गेला आणि कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांसाठी वेतन संरक्षणाची सुविधा दिली गेली, जेणेकरुन त्यांच्या नोकर्या जावू नयेत. त्यास पे-चेक सिक्युरिटी प्रोग्राम असे नाव देण्यात आले, ज्याचा खर्च जूनमध्ये 511 अब्ज डॉलर्स होता .
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.