अमेरिका: Summit Agricultural Group जगातील सर्वात मोठा इथेनॉल आधारित SAF प्लांट स्थापन करणार

ह्युस्टन : समिट ॲग्रीकल्चर ग्रुप (Summit Agricultural Group) ने युएस गल्फ कोस्ट (युएसजीसी) मध्ये जगातील सर्वात मोठा इथेनॉलवर आधारित टिकाऊ विमान इंधन प्लांट (SAF) बनविण्याची योजना तयार केली आहे. हा प्लांट २०२५ पासून दरवर्षी २५० मिलियन गॅलन ( २५० million gallons/year) क्षमतेने उत्पादन करेल. हा प्लांट कमी कार्बन असलेल्या इथेनॉलला SAF मध्ये रूपांतरित करण्यासाठी हनीवेलच्या इथेनॉल टू जेट उत्पादन प्रक्रियेचा वापर करेल. त्यातून विमान उद्योगासाठी आवश्यक असेलेल्या SAF ची गरज भागविण्यासह कमी कार्बन असलेल्या इथेनॉल उत्पादकांकडूनही मागणी वाढू शकेल.

समिट ॲग्रीकल्चरल ग्रुपचे सीईओ ब्रुस रॅस्टेटर यांनी सांगितले की, समिट ग्रुप सध्या योजनेच्या इंजिनीअरिंग आणि डिझाईनच्या टप्प्यात हनीवेल, बर्न्स आणि मॅकडोनेलसोबत भागीदारी करीत आहे. समिट एजी इन्व्हेस्टर्सचे अध्यक्ष जस्टिन किरचॉफ यांनी म्हटले आहे की, “इथेनॉल ते जेट” इथेनॉल उद्योगासाठी स्वाभाविकपणे एक पुढील पाऊल असेल. या प्लांटची २५० मिलियन गॅलन ही उत्पादन क्षमता किनारपट्टीवरील इतर प्रमुख SAF प्लांटच्या आकाराच्या जवळपास दुप्पटपेक्षा अधिक असेल. लुइसियानामध्ये, डीजी फ्युएल्सचा $२.५ बिलियनचा एक एसएएफ प्लांट २०२६ च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आधीच, डीजी फ्युएल्सने आपली सर्व प्रारंभिक उत्पादन क्षमता विविध खरदीदारांना विकली आहे. डेल्टा एअरलाइन्स २०२७ पासून सुरू होणाऱ्या सात वर्षाच्या कालावधीसाठी ५५ मिलियन गॅलन/ प्रती वर्ष खरेदी करण्यास तयार झाली आहे. एअर फ्रान्स-केएलएम २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० वर्षांच्या कालावधीसाठी २१ मिलियन गॅलन / प्रती वर्ष खरेदी करण्यास तयार आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, अथवा IATA च्या म्हणण्यानुसार, SAF उद्योगाचे डी-कार्बोनायजेशनमध्ये जवळपास ६५ % योगदान असेल.

अमेरिकेत सद्यस्थितीत SAF पुरवठा विमान क्षेत्राच्या डी-कार्बोनायजेशनसाठी आवश्यक गरजांच्या जवळपासही नाही. IATA च्या अनुमानानुसार, २०२१ मध्ये जागतिक स्तरावर २६.४ मिलियन गॅलन SAF चे उत्पादन करण्यात आले होते. मात्र, एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या अनुमानानुसार, अमेरिकेत २०२५च्या सुरुवातीला सध्याच्या उत्पादन स्तरामध्ये गतीने वाढ होण्याची अपेक्षा आहे. तेव्हा समिट ॲग्रीकल्चर ग्रुपसह इत नवे एसएएफ उत्पादन प्लांट्स ऑनलाइन येतील. अमेरिकेमध्ये इतर SAF उत्पादकांमध्ये LanzaJet चाही समावेश आहे. त्यांच्यातर्फे इथेनॉल-आधारित प्रक्रियेचा वापर करून SAF चे उत्पादनही केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here