फिलिपाईन्समध्ये इथेनॉलचा खप वाढण्याची शक्यता: USDA

मनिला : यंदा मागणी वाढल्याने फिलिपाइन्सच्या जैव इंधन खपात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, असे अमेरिकन कृषी विभागा (USDA) ने म्हटले आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बायोडिझेलच्या उत्पादनात जवळपास ८ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. २०२३ मध्ये फिलिपाइन्समध्ये इथेनॉलचा खप ८ टक्क्यांनी वाढून ६९३ दशलक्ष लिटर होईल. २०१९ मधील ६१४ दशलक्ष लिटर या कोविड महामारीपूर्वीच्या स्तरापेक्षा हा खप अधिक असेल असे USDA ने म्हटले आहे.
दरम्यान, बायोडिझेलचा खप १४ टक्क्यांनी वाढून २३० दशलक्ष लिटर होईल, अशी अपेक्षा USDA ला आहे. गेल्यावर्षीच्या २०२ दशलक्ष लिटरपेक्षा हा खप अधिक असेल. जर २०२३ चे पूर्वानुमान योग्य ठरले तरी २०१९ मधील २३१ दशलक्ष लिटर खपाच्या तुलनेत कमीच असेल. फीडस्टॉकच्या समस्येमुळे फिलिपाइन्सचे इथेनॉल उत्पादन सुमारे ३७५ दशलक्ष लिटरवर स्थिर राहील, अशी अपेक्षा यूएसडीएला आहे.

युएसडीएने म्हटले आहे की, इथेनॉल उत्पादनासाठी पुरेशा फीडस्टॉक बाबत तात्काळ कोणताही उपाय निघालेला नाही. मक्क्याचा फीडस्टॉकच्या रुपात वापर करण्याबाबत शिफारशी आहेत. मात्र, हे सरकारच्या अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या विरुद्ध असेल आणि प्लांट स्थापन करण्यासाठीही मोठ्या गुंतवणुकीची गरज भासेल. देशांतर्गत उत्पादीत बायोइथेनॉलसाठी फीडस्टॉक म्हणून जास्त प्रमाणात उसाच्या मोलॅसिसचा वापर केला जात आहे. तर बायोडिझेलचा फीडस्टॉक नारळ आहे. फिलिपाइन्समध्ये जैव इंधन मिश्रण १० टक्के इथेनॉल (E १०) आणि बायोडिझेल मिश्रण २ % (B २) वर निर्धारीत करण्यात आले आहे. स्थानिक उत्पादनातील तुट भरून काढण्यासाठी २०२३ साठी इथेनॉल आयात १२ टक्क्यांनी वाढून ३१० दशलक्ष लिटर होईल, अशी अपेक्षा युएसडीएला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here