यूएसडीएकडून अमेरिकेच्या साखर आयातीच्या अनुमानात वाढ

न्युयॉर्क : अमेरिकन कृषी विभागाने (USDA) बुधवारी अमेरिकेसाठी आपला साखर आयातीचा अंदाज वाढवला आहे. दरम्यान, देशातील साखरेचा वापर कमी होईल असे अनुममान वर्तवला आहे. याबाबत यूएसडीएने मासिक पुरवठा आणि मागणी अहवालात, ऑक्टोबर २०२३ – सप्टेंबर २०२४ या कालावधीत अमेरिकेची साखर आयात ३.४२ दशलक्ष टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आधीच्या अंदाजात ३.३५ दशलक्ष टन आयातीचे अनुमान होते.

गेल्या आठवड्यात कमी-शुल्क आयात कोट्या मध्ये वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर यूएसडीने उच्च आयातीचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, पुरवठा करणार्‍या देशांना १,२५,००० मेट्रिक टनांचा अतिरिक्त कोटा कसा वितरित केला जाईल हे सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही. यूएसडीएने अमेरिकेत साखरेचा वापर ७५,००० टनांपर्यंत कमी होईल असे अनुमान वर्तवले आहे.

अभ्यासकांच्या मते स्थानिक बाजारपेठेत मागणी स्थिर असल्याची स्थिती आहे. सॉसलँड पब्लिशिंगच्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या काळासाठी, अमेरिकेमधील बहुतेक प्रमुख साखर उपभोक्त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here