रोगापासून बचावासाठी चांगल्या प्रकारचे ऊस बियाणे वापरा: कार्यकारी संचालक

शाहाबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाच्या पिकाला विविध कीड रोगांपासून वाचविण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे वापरावे असे आवाहन शादाबाद को-ऑपरेटिव्ह शुगर मिलचे कार्यकारी संचालक सतींद्र सिवाच यांनी केले. उसाची विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे. अशा काही बियाण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही असे ते म्हणाले. सीवाच यांनी आपल्या कार्यालाक सहाय्यक ऊस विकास अधिकारी, साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक, ऊस वितरण अधिकारी, कारखान्याच्या ऊस पर्यवेक्षक, निरीक्षकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाच्या बियाण्यांबाबत तसेच कीड, रोगांबाबत सविस्तर चर्चा केली.

बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात को२३८ जातीचा ७० टक्के ऊस असल्याचे सांगितले. या वर्षी या प्रजातीवर सर्वाधिक रोगाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊसावर परिणाम झाला आहे. साखरेचा उताराही घटला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखान्याला नुकसान सोसावे लागत असल्याचे कर्मचारी म्हणाले. दरम्यान, कार्यकारी संचालक सतिंद्र सिवाच यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की त्यांनी शेतकऱ्यांना सीओ ०११८, सीओ ०१६० आणि सीओ १५०२३ या नव्या प्रजातींची माहिती द्यावी. या बियाण्यांवर शेतकऱ्यांना प्रती एकर अनुदानही दिले जात असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here