इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याची गरज: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लहान गुंतवणूकदारांनी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक नवीन मॉडेल तयार केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. FICCI च्यावतीने आयोजित तिसऱ्या रस्ते आणि महामार्ग शिखर परिषदेचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, सामान्य लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळेल याची खबदरादी घेतली जात. आहे. देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते दळणवळणाचे जाळे पसरले आहे. आगामी वर्ष २०२४ च्या अखेरीस रस्त्यांच्या या नेटवर्कचा विस्तार करून तो दोन लाख किलोमीटरपेक्षा अधिक करण्याची ही योग्य वेळ आहे.

गडकरी यांनी लॉजिस्टिक खर्च १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या आपल्या भूमिकेबाबत मांडणी केली. हे एक आव्हान असल्याचे ते म्हणाले. लॉजिस्टिक खर्चात कपात सुनिश्चित करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन अवलंबण्याची तातडीने गरज आहे. पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एलएनजी तथा इथेनॉल, मिथेनॉल, हायड्रोजन अशा बहुपर्यायी इंधनाच्या वापरासाठी लोकांना प्रोत्साहित करायला हवे. हे इंधन प्रकार किफायतशीर आणि टिकावू आहेत, असे गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here