ठाकूरद्वार : रानी नांगल येथील त्रिवेणी साखर कारखान्याने परिसरातील सूरजनगर, शरीफनगर आणि कारखान्याच्या गेटवरील शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कृषी विशेषज्ज्ञ डॉ. विकास मलीक, डॉ. मनोज श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. मलिक आणि डॉ. श्रीवास्तव यांनी ऊस उत्पादनाच्या आधुनिक तंत्राची माहिती दिली. ऊसावरील लाल सड रोगाला आळा कसा घालावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कारखान्याचे सरव्यवस्थापक वेंकटरमण यांनी शेतकऱ्यांनी को ००२३८ ऐवजी इतर वाणांची लागवड करण्याबाबत सूचना केली. ऊस विभागाचे व्यवस्थापक आझाद सिंह यांनी ऊसावरील बिजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक व्यवस्थापक विपिन कुमार यांनी साखर कारखान्याच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी संजय, विक्रम सिंह पंत आदी उपस्थित होते.