ऊस तोडणी मजुराची मुलगी बनली राज्य करनिरीक्षक

अंबड :ग्रामीण भागातील शेतकरी आई वडील मुलींवर उच्च शिक्षणासाठी विश्वास न ठेवता लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.काळानुसार मुलींवर विश्वास ठेवायला शिका.मुली यश खेचून आणत समाजात तुमची मान उंचावतील, असे प्रतिपादन सोनाली विक्रम मिसाळ-सानप यांनी केले. अंबड तालुक्यातील भगवाननगर येथील ऊसतोड कामगाराची मुलगी सोनाली विक्रम मिसाळ – सानप हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे राज्य करनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोनाली बोलत होत्या.सोनाली यांची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. नंतर एका छोटेखानी समारंभात सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी सानप, हभप अभिमन्यू खाडे, अशोकराव चिमणे, विष्णू लाड, सोमनाथ बडे, रमेश सुरवसे, पांडुरंग मिसाळ, विक्रम मिसाळ, नवनाथ लाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here