उत्तम शुगर मिल्स वाढवणार डिस्टिलरी आणि ऊस गाळप क्षमता

बरकतपूर : उत्तम शुगर मिल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने बरकतपूर प्‍लांटमध्ये डिस्टिलरी क्षमता (इथेनॉल) १५० केएलपीडीवरुन वाढवून २५० केएलपीडी करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी ५६ कोटी रुपये खर्च येणार आहे. आणि त्यासाठी भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या व्याज अनुदान योजनेअंतर्गत अंतर्गत संसाधने आणि कर्जाच्या माध्यमातून तरतूद केली जाणार आहे.
केंद्र सरकार इथेनॉल मिश्रणासाठी सर्व घटकांना प्रोत्साहन देत आहे. सरकारचे धोरण आणि राष्ट्रीय स्तरावर इथेनॉलची वाढलेली मागणी लक्षात घेवून कंपनीने बरकतपूर प्लांटमधील डिस्टिलरीची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच संचालक मंडळाने केन क्रशिंग क्षमता २३,७५० टीसीडीवरून वाढवून २६,३०० टीसीडी करण्यासही मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी अंतर्गत स्त्रोतांमधून तसेच कर्जाच्या माध्यमातून ४० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here