उत्तर प्रदेश : चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना ८२.५५ टक्के उसाची बिले अदा

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने २०१७ पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने, आतापर्यंत एकूण २,५०,१३७ कोटी रुपयांचे उसाचे पेमेंट केले आहे. ही रक्कम १९९५ पासून गेल्या २२ वर्षात, मार्च २०१७ पर्यंत अदा केलेल्या एकूण बिलांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत विविध साखर कारखान्यांनी उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १६३.२९ कोटी रुपये दिले आहेत.

साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाच्या म्हणण्यानुसार, २००७ ते २०१२ यांदरम्यान शेतकऱ्यांना ५२,१३१ कोटी रुपये, २०१२ ते २०१७ पर्यंत ९५,२१५ कोटी रुपये, २०१७ ते २०२२ पर्यंत १,६६,४२४ कोटी रुपये आणि आता ८३,७२,०२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशा प्रकारे २०१७ पासून आतापर्यंत गेल्या सात वर्षात शेतकऱ्यांना २,५०,१३७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चालू सत्र २०२३-२४ मध्ये आतापर्यंत ऊस बिलांचे २९,०५३ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. एकूण देय रकमेच्या हे प्रमाण ८२.५५ टक्के आहे. सध्या, एकूण कार्यरत १२१साखर कारखान्यांनी (८.४० लाख टीसीडी गाळप क्षमता) आतापर्यंत ९७५.७३ लाख टन उसाचे गाळप केले आहे आणि १०३.२८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here