उत्तर प्रदेश : आठवडाभरापासून ऊसाचे वजन केले जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

संत कबीरनगर : धनघाटा तहसील परिसरातील बकौली बाग येथे मुंडेरवा शुगर मिलने शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी ऊस वजन केंद्र सुरू केले आहे. मात्र साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ट्रक वेळेवर केंद्रात पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे वजन करण्याची चिंता सतावत आहे. तब्बल आठवडाभरापासून उसाचे वजन केले जात नसल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वजन काट्यावर निदर्शने केली. आमच्या उसाचे वेळेवर वजन केले नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.

आठवडाभरापासून बकोली येथील वजन काट्यावर उसाने भरलेल्या ट्रॉली थांबून असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ऊस वजन काट्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, आठवडाभरापूर्वी आम्ही ऊस ट्रॉलीत भरून येथे पाठवला होता. मात्र, उसाची खरेदी झालेली नाही. खरेतर येथे दररोज दोन ट्रक उसाची खरेदी व्हायला हवी. मात्र, आठवड्यातून फक्त २ ते ३ ट्रक उसाची खरेदी केली जाते. त्यामुळे नुकसान होत आहे. सलाहाबादचे रहिवासी महावीर प्रसाद, मल्हेपूरचे रहिवासी अनिल यादव, रामपूरचे रहिवासी सूरज यादव व सुरेश, पिप्रहीचे रहिवासी संजय चौधरी, नारायणपूरचे रहिवासी बरखू यादव, गौरापारचे रहिवासी रणजितसिंग आदींनी सांगितले की, कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत सीसीएस रवींद्र द्विवेदी म्हणाले की, वाहकुकदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. लवकरच दुसऱ्या वाहतुकदाराची नियुक्ती करून प्रश्न सोडवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here