उत्तर प्रदेश : उसाच्या को ०२३८ प्रजातीची लागवड न करण्याचे आवाहन

बिजनौर : बहादुरापूर येथील द्वारिकेश साखर कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत, ०२३८ या ऊस प्रजातीची लागवड न करण्यावर भर देण्यात आला. धामपूर रोडवरील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रात विविध कृषी तज्ज्ञांनी, शेतकऱ्यांनी वसंत ऋतूमध्ये सुधारित उसाच्या जातींची पेरणी करावी असे आवाहन केले. तसेच लाल सड रोगाने बाधित झालेल्या ०२३८ या प्रजातीच्या उसाऐवजी नव्या प्रजातींची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला.

साखर कारखान्याचे अधीक्षक एस. पी. सिंह यांनी शेतकऱ्यांना वसंत ऋतूमध्ये खंदक पद्धतीने चार फूट सरीमध्ये एकाच ओळीत ऊस लागवडीचे आणि प्रत्येक शेतात ट्रायकोडर्मा वापरण्याचे आवाहन केले. त्यांनी ०२३८ ऐवजी उसाच्या इतर जातींची लागवड करावी असे आवाहन केले. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह, वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक विश्वामित्र पाठक, ऊस समितीचे अध्यक्ष मलकीत सिंह, माजी अध्यक्ष सुरेश कुमार, सरव्यवस्थापक डॉ. रजनीश सिंह, अनिल सिंह पनवार, अनिल धनकड, अंगरेज सिंह आणि विनय सिंह इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here