उत्तर प्रदेश : श्री रेणुका शुगर्सच्या अनामिका साखर कारखान्याला १८३.८ कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीला मान्यता

लखनौ : भारतातील अनेक साखर कारखाने ऊस गाळप क्षमता वाढवत आहेत. अशाच पद्धतीने उत्तर प्रदेशातील अनामिका शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडने आपली ऊस गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री रेणुका शुगर्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अनामिका शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड (अनामिका) च्या संचालक मंडळाने, २६ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, ऊस गाळप क्षमता ४,००० टीसीडीवरून ७,००० टीसीडीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या भंडोरिया येथे असलेल्या अनामिकाच्या प्लांटमध्ये १५ मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १८३.८ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली.

पुढील गाळप हंगाम म्हणजेच, २०२५-२६ सुरू होण्यापूर्वी प्रस्तावित विस्तार पूर्ण होणे अपेक्षित आहे. या विस्तारामुळे कंपनीला उसाच्या अतिरिक्त उपलब्धतेचा वापर करण्यास मदत होईल. यामुळे ऑपरेशनल कामगिरी सुधारेल आणि उसापासून साखर उत्पादनाचा खर्च कमी होईल. ऑक्टोबर २०२३ मध्ये, श्री रेणुका शुगर्सने अनामिका शुगर मिल्सचे २३५.५ कोटी रुपयांच्या १०० टक्के इक्विटी शेअर्सचे अधिग्रहण पूर्ण केले. या संपादनामुळे कंपनीला साखर उत्पादक राज्यांपैकी प्रमुख असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यात आणि उत्तर, पूर्व भारतातील बाजारपेठेची पूर्तता करण्यात मदत झाली आहे.

साखर उद्योगातील अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here