उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांकडे १२,४०० कोटींची थकबाकी

लखनौ : सध्या राज्यातील ऊस गाळप हंगाम नियमित सुरू आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप या हंगामातील उसाची राज्यातील आधारभूत किंमत (एसएपी) जाहीर केलेली नाही. उत्तर प्रदेशमधील साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार, साखर कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे ५६० लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळप केलेल्या ऊसाचे मूल्य साधारणतः १७ हजार ६३५ कोटी रुपये आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ७२०५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. २०२०-२१ या हंगामात ६ फेब्रुवारीअखेर १० हजार ४३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय, गेल्या काही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे यापूर्वीच्या काही हंगामातील १२०७ कोटी रुपये थकीत आहेत. त्यावरील व्याजाची रक्कम ७५० कोटी रुपये आहे. त्यामुळे एकूण थकबाकीचा आकडा १२ हजार ४०० कोटी रुपये आहे. आता राज्य सरकारकडून एसएपी जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास गती येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here