उत्तर प्रदेश : ऊस समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी, आज जाहीर होणार हंगामी मतदार यादी

सहारनपूर : राज्यात ऊस विकास समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. सर्व समित्यांच्या मतदारांची तात्पुरती यादी आज, सोमवारी प्रदर्शित होणार आहे. या मतदार यादीवर २४ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हरकती नोंदवता येतील. जिल्ह्यात सहा ऊस समित्या आहेत. यामध्ये देवबंद, सहारनपूर बेहट आणि सरसावा येथील ऊस विकास समित्या तसेच नानौता आणि सरसावा येथील साखर कारखाना समित्यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर रोजी मतदार यादीवरील आक्षेपांचे निराकरण करण्यात येईल. त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रदर्शित होणार आहे.

प्रतिनिधी पदासाठी २६ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज भरले जाणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी छाननी होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी नावे मागे घेणे आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदान होईल. संचालक पदासाठीची मतदार यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार असून, ९ ऑक्टोबरला हरकतींचे निराकरण करण्यात येणार आहे. १० ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल आणि १६ ऑक्टोबर रोजी मतदान, मतमोजणी होईल. सभापती व उपसभापतीची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here