उत्तर प्रदेश : ऊस दरप्रश्नी भाकियू टिकैत गट करणार मंगळवारी निदर्शने

अमरोहा : शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ७ जानेवारी रोजी जिल्हा मुख्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय किसान युनियन टिकैत गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी विजयपाल सिंह यांनी सांगितले. भाकियूच्यावतीने प्रयागराज येथे होणारे शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. फतेहपूर मधील छेत्रा गावात किसान भवन येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उसाला ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय उपाध्यक्षांनी केली.

प्रयागराज येथे १६ ते १८ जानेवारी यादरम्यान, आयोजित करण्यात येणाऱ्या संघटनेच्या शिबिराची माहिती यावेळी दिली. स्थानिक कार्यकर्त्यांना शिबिराला येण्याचे आवाहन करण्यात आले. गावोगावी घरगुती कनेक्शनवर स्मार्ट वीज मीटर बसविण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला. तसेच मोकाट जनावरे पकडण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून तहसीलमधील पायवाटा निश्चित करण्याची मागणी केली. यावेळी दानवीर सिंग, राहुल कृष्ण यादव, लवेंद्र भाटी, आलोक कुमार, राजेंद्र सिंग, बाबी चहल, सुभाष चीमा, सुधाकर सिंग, रामपाल सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here