उत्तर प्रदेश : शामली जिल्ह्यात को-०२३८ जातीच्या उसाच्या लागवडीत घट

शामली : गेल्या काही वर्षांपासून को-०२३८ जातीच्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. ऊस विभाग, साखर कारखानदार आणि कृषी शास्त्रज्ञांनीही शेतकऱ्यांना ऊसाची प्रजाती बदलण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्रज्ञांनी ०२३८ या प्रजातीऐवजी इतर जातीचा ऊस लागवड करण्याचे आवाहन केले आहे. को-०२३८ प्रजातीचा ऊस हटवण्याची मोहीम संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. त्याचा परिणाम शामली जिल्ह्यातही दिसून येत आहे. शेतकरी आता या प्रजातीपासून दूर होताना दिसत आहेत.

हिंदुस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जवळजवळ दोन दशकांपासून शामली तसेच पश्चिम उत्तर प्रदेश पट्ट्यात को-०२३८ ऊसाची प्रजाती प्रसिद्ध आहे. या उसाचे वजन, जाडी आणि उतारा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना को-०२३८ जातीच्या उसाची लागवड करण्यास प्रवृत्त केले. या प्रजातीने शेतकऱ्यांना समृद्ध केले. परंतु आता या प्रजातीमध्ये रोगराई वाढू लागली आहे. त्यावर लाल सड, टॉप बोअरर, पोक्का बोईंग आदी आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे ऊस विभागाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नव्या वाणाकडे वळावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी रणजितसिंह कुशवाह यांनी सांगितले की, जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रफळ ०२३८ प्रजातीचे आहे. आतापर्यंत यातील सुमारे २२ टक्के क्षेत्र घटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here