उत्तर प्रदेश : राज्यात घटलेला साखर उतारा, रोगग्रस्त उसाचा दरवाढीत अडथळा

मेरठ : रोगग्रस्त पिक आणि हवामानामुळे प्रभावित झालेल्या उसापासून साखरेच्या उताऱ्यामुळे यंदा ऊस दरवाढीत अडथळा आला आहे. साखरेचे भरपूर उत्पादन देणाऱ्या को-०२३८ प्रजातीवरील लाल सड रोग आणि प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी उसाचे उत्पादन सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहे. साखरेचे उत्पादनही सुमारे ०.७० टक्क्यांनी घटले आहे. कमी उताऱ्याचे कारण देत साखर उद्योगाने उसाची दरवाढ होऊ नये, असा आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे शेतकरी पीक कमी आल्याने खर्च वसूल करू शकत नसल्याचे सांगत उसाच्या दरवाढीची अपेक्षा केली. तर साखरेच्या कमी उत्पादनामुळे राज्य सरकारने उसाचा दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.

यावेळी, ऊस हंगामाच्या सुरुवातीपासूनच, उसाचा भाव जाहीर करण्याची मागणी सातत्याने होत होती. राष्ट्रीय लोकदलाच्या प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी सरकारकडे सतत ऊसाचा भाव ४०० रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी करत होते. छपरौली येथील चौधरी अजित सिंग यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही हीच मागणी पुन्हा करण्यात आली. पण, यावेळी उसाचे अर्थशास्त्र वेगळे होते. मात्र, हवामानाच्या स्थितीमुळे उसाच्या नगदी पिकावर मोठा परिणाम झाला आहे. उसातील साखरेचे प्रमाण जे पूर्वी १५ टक्के रिकव्हरी देत होते, ते फक्त ९ टक्के झाले आहे. ऊस दराबाबत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे नाही तर व्यापाऱ्यांचे सरकार आहे. खते आणि बियाण्यांवरील महागाईदेखील सतत वाढत आहे. पण पिकांच्या किमती वाढलेल्या नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here