लखीमपुर खिरी : कुंभी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणारी उसाची गुऱ्हाळे, क्रशर यावेळी नोव्हेंबरपूर्वी सुरू होऊ शकणार नाहीत. ऊस आयुक्तांनी साखरेची गुणवत्ता, प्रदूषण आदी मुद्यांवर खांडसरी युनिट, गुऱ्हाळावर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ऊस आयुक्तांनी सर्व खांडसरी युनिटना तसेच गुऱ्हाळघर मालकांना उत्तर प्रदेश प्रदूषण विभाग तथा अन्न सुरक्षा विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पथकांकडून परीक्षण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
ऊस आयुक्तांच्या या आदेशानंतर खांडसरी युनिटचे मालक तथा क्रशर मालकांमध्ये कारवाईबाबत संभ्रमाची स्थिती आहे. बहुतांश खांडसरी युनिट तसेच क्रशर मालकांकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या निकषांचे पालन केले जात नाही. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात गुऱ्हाळे, क्रशर सुरू होतील अशी शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.