उत्तर प्रदेश: ऊस लागवड, उत्पादन वाढीसाठी घर-घर दस्तक अभियान

मेरठ : राज्यात ऊस उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत आता ऊस विभागाने घर घर दस्तक अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ऊस विभाग आणि कारखान्यांच्यावतीने अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांना आडसाली ऊस लागवड तसेच आधुनिक शेतीबाबत माहिती दिली जाणार आहे. बस्ती जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

ऊस लागवड वाढविण्याचे आवाहन करत साखर कारखाना परिसरात रॅली काढण्यात आली. ऊस विभागाचे नोडल अधिकारी, अप्पर आयुक्त व्हि. के. शुक्ल यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळवून देणे हा विभागाचा उद्देश आहे. अभियात अप्पर ऊस आयुक्तांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून शेतकरी अधिक लाभ मिळवू शकतात असे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर खते, किटकनाशके, बियाणे उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादकांना सर्व लाभ मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. साखर कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापकांनी मार्गदर्शन केले. एलएसएसचे ऊस सल्लागार एस. पी. मिश्रा यांनी आंतरपिकांबाबत मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here